आयुध निर्माण संस्थांच्या खासगीकरणाला विरोध

नागपूर
केंद्र सरकारने आयुध निर्माण संस्थांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात नागपुरातील वाडी महामार्गावर आंदोलन करण्यात आले. आयु धनिर्माण युनियनच्या अहवालानंतर कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी हा मोर्चा काढला. मोर्चात कामगारांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंबाझरी परिसरात मोर्चा पोहोचताच सरकारविरोधात निदर्शेने करण्यात आली. केंद्र सरकारच्या या खासगीकरणाच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून रेड युनियन, बीएमएस, इंटक आणि लोकशाही कामगार या संघटना आंदोलन करत आहेत. आयुध निर्माणचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी दत्तवाडी डिफेन्स प्रवेशद्वारावर बॅनर लावून निषेध व्यक्त केला.
तसेच दोन दिवसाआधीही आयुध निर्माणच्या कर्मचार्‍यांनी मुंडन करून निषेध दर्शविला होता.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis