” चला बोलुया ” च्या माध्यमातून 34 प्रकरणे निकाली

पुणे : नवरा बायको यांच्यातील वाद, पोटगी संबंधीच्या तक्रारी, तसेच मुलांच्या ताब्याविषयीच्या प्रश्नावर समुपदेशनातून तोडगा काढण्याकरिता पुण्यातील फॅमिली कोर्टात ” चला बोलूया” हे वादपूर्व विवाहविषयक समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या समुपदेशन केंद्रात समुपदेशकांच्याव्दारे तडजोडीतून ३४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. केंद्रात गेल्या वर्षभरात २६० प्रकरणे दाखल झाली होती.
वषार्पूर्वी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राचे उद्घाटन मुंबई हायकोटार्चे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते करण्यात आले.या केंद्रामध्ये वैवाहिक, कौटुंबिक स्वरुपाचे वाद प्रत्यक्ष कोर्टात दाखल होण्यापूर्वी उभय पक्षकारांचे मोफत समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा किंवा त्यांच्यामध्ये परस्पर संमतीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. या केंद्रात पती – पत्नीमधील वाद, पोटगी संबंधीचे वाद, मुलांच्या ताब्याचे वाद, पती पत्नीच्या मालमत्तेचे वाद या व्यतिरिक्त आई वडील, मुले यांच्यातील पोटगी किंवा सांभाळ करण्याबाबतचे वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांच्याकडे या कें द्राची प्रशासकीय जबाबदारी आहे. मानसी रानडे, मीलन पटवर्धन, पूनम निंबाळकर, मधुगीता सुखात्मे, सविता देशपांडे, प्रशांत लोणकर, दिप्ती जोशी, नैना आठल्ये, जुही देशमुख हे तज्ञ समुपदेशक या केंद्रात सेवा देत असून केंद्राचे काम सुरळीत चालण्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. डी. कुलकर्णी, फॅमिली कोटार्चे प्रमुख न्यायाधीश ए. ए. शहापुरे हे मार्गदर्शन करतात.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *