डॉक्टरची रूग्णाला खांद्यावर घेऊन पायपीट

पाच किलोमीटरचा प्रवास करून वाचवले तिघांचे प्राण

हैदराबाद
आरोग्याच्या सुविधा आजही आदिवासी भागात मिळत नसल्याचे चित्र आहे. आदिवासी भागाला जोडणारे पक्के रस्ते नसल्यामुळे दळणवळण व्यवस्था टप्प असल्यामुळे डॉक्टर या भागात पोहचू शकत नाही. मात्र तेलंगणामध्ये अशाच एका आदिवासी महिलेला उपचारासाठी चक्क डॉक्टरांनी खांद्यावर घेऊन पाच किलोमीटरचा प्रवास करत, एका महिलेचा व तिच्या नवजात दोन बालकांचा प्राण वाचवले.
तेलंगणमधील एका गावामध्ये जेव्हा एका सरकारी डॉक्टरांनेच चक्क एका महिलेला आणि तिच्या दोन नवजात बालकांना खांद्यावर घेऊन पाच किलमोटीरचे अंतर पार करत दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले.
पलवांचा येथील राला चेलूका या गावामधील 22 वर्षीय सुकी नावाच्या महिलेची प्रसुती झाली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र प्रसुतीनंतर तिच्या शरिरातून होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावेळी तिची प्रसुती करणार्‍या डॉ. एल. रामबाबू यांनी तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. या महिलेला रामबाबू यांनी आहे त्या स्थितीमध्ये सरकारी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा भाग अतिशय दूर्गम आणि जंगली प्रदेशात असल्याने वाहने तेथे पोहचू शकत नसल्याने रामबाबू यांनी खांद्यावर कावड करुन या महिलेला आणि तिच्या दोन्ही नवजात बालकांना मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने रुकी झोपलेली त्याच खाटेला चारीबाजूंनी सुतळी बांधून त्या एका बांबूला बांधत त्याची कावड तयार केली. त्यानंतर डॉ. रामबाबू यांनी डोलीची पुढची बाजू स्वत:च्या खांद्यावर घेतली तर मागील बाजू रुकीच्या कुटुंबियांनी आलटून पालटून संभाळली. पाच किलोमीटरपर्यंत असा प्रवास झाल्यानंतर अखेर रुकी आणि तिची दोन्ही जुळी मुलं मुख्य रस्त्यावर पोहचली तेथून त्यांना वहनांच्या मदतीने सरकारी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उलवानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणार्‍या रामबाबू यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना त्या महिलेचे आणि तिच्या बाळांचे प्राण वाचले. डॉक्टरांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियवरून डॉक्टरांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. याबाबत बोलतांना डॉक्टर डॉ. एल. रामबाबू म्हणाले की, ‘प्रसुती झालेल्या महिलेचा रक्तस्त्राव थांबत नसल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच तिने जन्म दिलेल्या दोन्ही जुळ्यांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्यांनाही त्रास होत होता. त्यामुळेच आदिवासी वस्ती अशणार्‍या भागांमध्ये या नवजात बालकांनाही त्रास होण्याची शक्यता होती. म्हणूनच मी कुटुंबियांना विश्‍वासात घेऊन या तिघांनाही आरोग्य केंद्रात हलवण्याचा निर्णय घेतला. आम्ही या तिघांना एका डोलीमध्ये मामीदीगुदेम येथील रस्त्यापर्यंत घेऊन आलो आणि तिथून त्यांना भाडराचमल येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *