काश्मिरी नेत्यांच्या सुटकेसाठी उद्या आंदोलन

दिल्लीतील जंतर मंतरवर सर्व विरोधक जमणार; द्रमुकच्या स्टॅलिन यांचा पुढाकार

नवीदिल्ली
कलम 370 हटवल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेत्यांना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या नेत्यांच्या सुटकेसाठी द्रमुक पक्षाच्या नेतृत्वाखाली 22 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व विरोधकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून आजही शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले. चकमकीत एक भारतीय जवान हुतात्मा झाला.
स्टॅलिन यांनी म्हटले आहे, की एकता आणि लोकशाही याच्यावर ज्यांचा विश्‍वास आहे, अशा लोकांनी या निषेध आंदोलनात सहभागी व्हावे. यामध्ये काँग्रेससह सीपीएम, सीपीआय, आययूएमएल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, व्हीसीके, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल या विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची गळचेपी सुरू असून गेल्या 14 दिवसांपासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्यांच्या सुटकेची मागणी आम्ही करणार आहोत. दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडून काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत काश्मीरमधील मानव हक्कांसाठी आणि शांततेसाठी आपण प्रार्थना करूयात, असे म्हटले आहे.

केंद्र सरकारने पाच ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला स्वायत्ततेचा दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश केले. येत्या 31 ऑक्टोबरपासून केंद्राचा हा निर्णय येथे लागू होणार आहे. दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले असून अद्यापही येथे काहीअंशी तणावाची परिस्थिती कायम आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे अद्यापही नजरकैदेत आहेत.

सीमेवरच्या गावांवर उखळी तोफांचा मारा
पाकिस्तानी सेनेने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पूंछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार केला. यामध्ये रवि रंजन कुमार सिंह हे हुतात्मा अन्य चार जवानही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वेळी पाकिस्तानकडून सीमा रेषेजवळ असलेल्या चौक्यांना लक्ष्य केले गेले. शिवाय सीमेलगतच्या गावांवरदेखील उखळी तोफांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

गुलाब नबी आझादांचा काश्मीर प्रवेश पुन्हा रोखला
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना मंगळवारी दुपारी दुसर्‍यांदा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. जम्मू विमानतळावर उतरताच आझाद यांना ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन केल्यानंतर आझाद यांनी दुसर्‍यांदा राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याअगोदर आठ ऑगस्टला त्यांना श्रीनगर विमानतळावरच ताब्यात घेऊन परत पाठविण्यात आले होते.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis