वायु दलाला वापरावी लागतात 44 वर्षांची जुनी मिग विमाने

नवीदिल्ली
भारतीय वायु दलाच्या ताफ्यातील मिग-21 विमानांबद्दल वेळोवेळी प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वायु दलाचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी एका कार्यक्रमात अजूनही मिग-21 फायटर विमाने वापरावी लागत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. वायु दल आजही 44 वर्ष जुनी मिग-21 विमाने वापरत आहे. इतक्या जुन्या मोटारी कोणीही चालवत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

चार दशकापूर्वीची ही फायटर विमाने अजूनही भारतीय हवाई दलाचे महत्वाचे अंग आहे. सहा महिन्यांपूर्वी डॉगफाइटच्यावेळी पाकिस्तानकडे अत्याधुनिक एफ-16 विमाने होती. भारतीय वायु दल आजही 44 वर्ष जुनी मिग-21 विमाने वापरत आहे. इतक्या जुन्या कार कोणीही चालवत नाही, हे विधान धनोआ यांनी केले.
त्या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांच्या शेजारी बसले होते. भारतीय वायु दलाचे स्वदेशीकरण आणि आधुनिकीकरणासंबंधीच्या परिषदेमध्ये ते बोलत होते.

मिग-21 फायटर विमाने टप्याटप्याने निवृत्त होत आहेत. मिग-21 विमानांच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य मोठया प्रमाणात भारतात तयार केले जाते. त्यामुळेच हे विमान अजूनही सेवेत आहे. मिग-21 च्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या 95 टक्क्यांपेक्षा जास्त सुट्टया भागांचे उत्पादन भारतात केले जाते. रशिया आता मिग-21 विमानांचा वापर करत नाही. 1973-74 साली मिग-21 विमानांचा वायु दलात समावेश झाला. 2006 साली 110 मिग-21 विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले. आत ही विमाने मिग-21 बायसन म्हणून ओळखली जातात. गेल्या काही वर्षात मिग-21 विमानांचे अनेक अपघात झाले आहेत.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis