स्टेट बँकेचे गृह, वाहनकर्ज स्वस्त

नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांसाठी खूशखबर आहे. बँकेने फेस्टिव्हल सीझनमध्ये गृह आणि वाहनकर्ज स्वस्त केले असून, वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठीच्या कालावधीतही वाढ केली आहे. ग्राहकांना स्वस्त कर्जांसह प्रोसेसिंग फीमध्ये सवलत आणि प्री-अ‍ॅप्रुव्ह्ड डिजिटल कर्ज सुविधेचाही लाभ घेता येणार आहे, असे बँकेतर्फे सांगण्यात आले.

एसबीआयने आज अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. सण-उत्सव काळात वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ केली आहे. किमान व्याजदराने ग्राहकांना वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किमान व्याजदर 8.70 टक्के असेल. एस्केलेशन शुल्कही आकारले जाणार नाही, अशी माहिती बँकेने दिली.
वाहन कर्जासाठी बँकेच्या वेबसाइटद्वारे अर्ज करणार्‍या ग्राहकांना व्याजदरात 25 बेसिस पॉईंटचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. वेतनधारक कारच्या ऑन रोड किंमतीतील 90 टक्के रक्कम कर्जस्वरुपात घेऊ शकतात.

एसबीआय सध्या 8.05 टक्के व्याजदराने (रेपो लिंक्ड लेंडिंग रेट) गृहकर्ज देत आहे. एक सप्टेंबरपासून हे दर जुन्या आणि नव्या कर्जधारकांसाठी लागू होतील. 20 लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज किमान व्याजदराने मिळणार असून, त्यावर 10.75 टक्के किमान व्याजदर आकारले जात आहे. वैयक्तिक कर्जाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. याशिवाय बँकेचे सॅलरी अकाऊंट असलेले ग्राहक योनोच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे प्री-अ‍ॅप्रुव्ह्ड कर्जही घेऊ शकतात. शैक्षणिक कर्जही उपलब्ध असून, देशात शिक्षण घेण्यासाठी 50 लाख रुपये, तर परदेशात शिक्षण घेण्यासाठी दीड कोटींपर्यंत कर्ज मिळू शकते.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *