हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणात छोटा राजन दोषी

मुंबई / प्रतिनिधी
मुंबईतील विशेष न्यायालयाने हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह सहा जणांना दोषी ठरवले आहे. छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न व 2012 मध्ये हॉटेल व्यावसायिक शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने 1332 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. शेट्टी यांच्यावर 2012 मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते.
शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते; मात्र तरीही त्यांनी जवळील पोलिस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जानेवारी 2013 मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात छोटा राजनच्या सूचनेवरूनच शेट्टींना गोळी मारण्यात आल्याचे म्हटले होते. छोटा राजन यास 2015 मध्ये बाली येथून अटक करून भारतात आणण्यात आले, तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. त्याला मागील वर्षीच पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis