विसर्गाची माहिती देणे बंद होणार असल्याने पाकिस्तानात पूरसंकट?

नवीदिल्ली

भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला असून त्यांनी भारताशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेत असहकार पुरकारण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानबरोबर 1989 साली पूर परिस्थितीमध्ये जलस्त्रोतांसंदर्भातील माहिती देण्यासंदर्भात झालेल्या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार नसल्याचे भारताने जाहीर केले आहे. पाण्याचा अती विसर्ग केल्यास किंवा गंभीर पूरपरिस्थीती उद्भवल्यास पाकिस्तानला महिती देण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील नदी किनारच्या शहरांना आणि गावांना पुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारताने पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी हा करार 1989 साली केला होता. दरवर्षी या कराराचे नूतनीकरण केले जाते; मात्र कलम 370 वरून पाकिस्तानने घेतलेली आठमुठी भूमिका पाहता भारताने हा करार या वर्षी न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘या वर्षी हा करार केला जाणार नाही,’ अशी माहिती सिंधू पाणी कराराअंतर्गत नियुक्त करण्यात आलेले भारतीय आयुक्त पी. के सक्सेना यांनी दिली; मात्र या निर्णयाचा सिंधू पाणी करारावर काहीही परिणाम होणार नसून सिंधू नदीचे पाणी दोन्ही देशांमध्ये करारानुसारच वाटले जाणार आहे. ‘भारत हा एक जबाबदार देश असून आम्ही सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करणार नाही,’ असे सक्सेना यांनी सांगितले आहे.

1989 सालापासून करण्यात येणार्‍या या करारानुसार भारत 1 जुलै ते 10 ऑक्टोबरदरम्यान पाकिस्तानला जलस्त्रोतांची माहिती देत असे. याबद्दल बोलताना सक्सेना म्हणतात, की या कराराचा सिंधू पाणी कराराशी काहीही संबंध नाही. भारताने पाकिस्तानबरोबर केलेला हा पूर्णपणे वेगळा करार होता. 1989 पासून दरवर्षी आवश्यक बदल करून या कराराचे नूतनीकरण केले जायचे. या करारानुसार भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा अधिक विसर्ग करण्याबद्दल आणि पुराबद्दल आगाऊ माहिती दिली जायची. जेव्हा जेव्हा नद्यांमधून पाण्याचा अधिक विसर्ग केला जायचा, तेव्हा पाकिस्तानला यासंदर्भातील माहिती दिली जायची. आता भारतातील नद्यांमधून पाकिस्तानमध्ये जाणार्‍या पाण्याची माहिती पाकिस्तानला दिली जाणार नाही. त्यामुळे तेथील नदीकाठी असणार्‍या शहरांना पुराचा किती फटका बसेल, याचा योग्य अंदाज बांधता येणार नाही. सक्सेना यांनी 1989 पासूनचा करार रद्द करण्याची माहिती दिली असून याचा पाकिस्तानला फटका बसण्याची शक्यता आहे.

..

अतिरिक्त पाणीवापरावरही काम सुरू

सिंधू पाणी करारानुसार ठरल्या पेक्षाही भारताच्या हिस्स्याचे जास्त पाणी पाकिस्तानला जाते. आता आम्ही या कराराला कुठेही धक्का न लावता भारताच्या वाट्याचे असलेल्या मात्र पाकिस्तानला जाणार्‍या या अतिरिक्त पाण्याचा वापर शेतकरी, उद्योग व वीज निर्मितीसह नागरिकांना पुरवण्यासाठी करणार आहोत. सिंधू नदीचे भारताच्या वाट्याचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडवण्यासंदर्भात काम सुरू झाले आहे. यासाठी आम्ही हाइड्रोलॉजिकल आणि टेक्नो फिजिबिलिटी स्टडीजवर काम करत आहोत, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *