उच्चपदवी असताना खुशबू लष्करात!

चेन्नई
‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्ल सायन्स’मधून पदवी संपादन केल्यानंतर कुणालाही आंतरराष्ट्रीय संस्थेत मानाची आणि लठ्ठ पगाराची नोकरी मिळते, हे वेगळे सांगायला नको. अशीच नामी संधी पायाशी आलेली असतानाही लठ्ठ पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवून खुशबू जैन या 24 वर्षीय तरुणीने लष्करात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला. खुशबूचे सर्व वर्गमित्र टॉपच्या कंपनीत अधिकाराच्या जागा मिळवत असताना, वेगळी वाट चोखाळत खुशबूने ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत (ओटीए) जाण्याचा निर्णय घेत भारतीय तरुण, तरुणींपुढे आदर्श निर्माण केला आहे.

खुशबू ही कोईम्बतूरची रहिवासी. तिने दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम ही पदवी घेतली. त्यानंतर 2016 मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ती लंडनला रवाना झाली.
आपल्या ध्येयाबाबत सांगताना खुशबू म्हणाली, की मला देशासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे. लंडनला असतानाच मी ठरवले, की मला कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करायचीच नाही. मी घेतलेल्या कोर्समध्ये मी एकटीच भारतीय विद्यार्थी होते. माझ्या सर्व सहकार्‍यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकर्‍या पटकावल्या.

लष्करातील प्रशिक्षण अतिशय खडतर असल्याचेही खुशबू सांगते. यातून आपण तावून सुलाखून बाहेर निघालो असल्याचेही ती म्हणते. या प्रशिक्षणासाठी खुशबूसोबत आणखी 183 उमेदवार प्रशिक्षण घेत होते. यांमध्ये 12 पुरुष आणि नऊ महिला या भूतान, सियाचेल, मालदीव, फिजी आणि युगांडा येथून आलेले होते. अंजली नारायण हिनेदेखील टीएस कंपनीची नोकरी सोडून लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. तिने बंगळूरमध्ये तीन वर्षे नोकरी केली. आपण आतापर्यंत वातानुकूलीत रुममध्ये आरामात काम करत होतो; पण आता मी घामाच्या घारांमध्ये भिजत आहे. अधिकाधिक तरुण, तरुणींनी लष्कराता यायला हवे, असे अंजलीचे म्हणणे आहे.

दक्षिण कमांडिंग-इन चीफ जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल सतिंदरकुमार सैनी यांनी पासिंग आउट परेडचा आढावा घेतला. शनिवारी नियुक्त झालेल्या रवी कुमार यांना त्यांनी ‘सॉर्ड ऑफ ऑनर’ आणि सुवर्णपदक दिले,अभिषेक कुमार यांना रौप्य पदक आणि विक्रमादित्य मानकर यांना कांस्यपदक प्रदान केले.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis