370 हटविणे, तलाक बंद हे सरकारचे मोठे काम: जावडेकर

नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळास आज 100 दिवस पूर्ण झाले, त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेतला. ‘100 दिवसांत इतके महत्त्वपूर्ण आणि इतके जास्त निर्णय अन्य कुठल्या सरकारने घेतले नसतील,’असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे, तीन तलाक प्रथा बंद करणे ही सरकारची महत्त्वाची कामगिरी आहे. गेली 70 वर्षे जम्मू-काश्मीर वेगळा पडला होता. तेथील नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता जम्मू-काश्मीर आणि लडाखला सर्व योजनांचे लाभ मिळू लागले आहेत. पाकिस्तानने सगळ्या जगाचे दरवाजे ठोठावले; पण संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभे राहिले, असे जावडेकर यांनी सांगितले.
जावडेकर पुढे म्हणाले, की तीन तलाक, पॉक्सो, समान वेतन, सहा कोटी लहान व्यापारी आणि 14 कोटी शेतकर्‍यांना पेन्शन देण्याच्या योजनेसारखे महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतले. आयुष्मान भारत, उज्वला गॅस योजनेची व्याप्ती पूर्ण भारतभर वाढवली. मोदी सरकारच्या काळात गरीब, मजूर, शेतकरी, आदिवासी सक्षम बनतील असे निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *