कॉंग्रेसने फेटाळला पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

सुनील जाखड यांच्यावर पक्षश्रेष्ठींचा विश्‍वास

चंडीगढ -कॉंग्रेसने शनिवारी पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी दिलेला राजीनामा फेटाळला. त्यामुळे जाखड यांच्यावर पक्षश्रेष्ठींचा विश्‍वास कायम असल्याचे स्पष्ट झाले.

जाखड यांनी पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना भाजपने रिंगणात उतरवलेले अभिनेते सनी देओल यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या पुढच्याच दिवशी जाखड यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला.

मात्र, तो स्वीकारण्यात आला नव्हता.
आता जाखड यांचा राजीनामा फेटाळण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसच्या पंजाब प्रभारी आशा कुमारी यांनी दिली. जाखड यांनी त्यांचे चांगले कार्य पुढेही सुरू ठेवावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणून जाखड यांनी केलेल्या कार्यावर कॉंग्रेस श्रेष्ठी खुष असल्याचे समजते. जाखड यांनी राजीनामा देण्याची आवश्‍यकता नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यावेळीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली होती. आता त्यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या कॉंग्रेसच्या निर्णयाचे अमरिंदर यांनी स्वागत केले आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Dainik Prabhat

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis