महानगर प्रदेशाचा दर्जा उंचावणार

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या (एमएमआर) हद्दवाढीच्या निर्णयामुळे विकास प्रकल्पांना काय लाभ होईल? हद्दवाढीचा मुख्य उद्देश काय?
राजीव – भूपृष्ठाखालील किंवा जमिनीवरील पाण्याचा अंतर्भाव असलेले क्षेत्र ‘एमएमआर’च्या हद्दीत, अखत्यारीत येईल. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांना मदत होईल. पालघर तालुक्याचा विकास ‘एमएमआर’च्या सहकार्याने होणार आहे. मुंबई ते अहमदाबाददरम्यानच्या बुलेट टे्रन या अतिवेगवान रेल्वेच्या स्थानकांमुळे ‘एमएमआर’ क्षेत्रामध्ये रोजगाराची केंद्रे निर्माण होऊ शकतील. पुणे आणि गोव्याच्या दिशेने मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीचे अधिक चांगले नियोजन करता येणे शक्य आहे.
तसेच योग्य ठिकाणी विकास केंद्रेही निर्माण करता येतील.
यामुळे नेमका परिणाम काय होईल?
राजीव – सर्वसमावेशक नियोजन करून ‘एमएमआर’च्या संपूर्ण हद्दीत विकास आणि नियोजन केले जाईल. जिल्हाधिकारी ग्रामीण भागाच्या विकासासाठी परवाने देतील. प्राधिकरण विकासकामांची अंमलबजावणी करेल आणि त्यांना चालना देईल. त्यामुळे जीवनमानाचा दर्जा सुधारेल.
नव्याने जोडल्या गेलेल्या नगर पंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्या कामामध्ये सकारात्मकता येऊ शकेल का?
राजीव – ‘एमएमआर’च्या नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरात पालघर नगर परिषद आहे. या भागात मूलभूत सुविधांची तरतूद करणे आणि विकासाला दिशा देऊन शाश्वत नागरीकरण करणे हे हद्दवाढीचे उद्दिष्ट आहे. त्याचसोबत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या क्षेत्राचे संरक्षण करणे आणि ते राखून ठेवणे हेही महत्त्वाचे आहे.
भविष्यात आणखी हद्दवाढ करण्याचे काही नियोजन?
राजीव – प्राधिकरणाकडून सध्या तरी तसा विचार सुरू नाही. ‘एमएमआर’च्या हद्दीतून सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेच्या माध्यमातून होणारी प्रवासी वाहतूक वाढली आहे. या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रादेशिक योजनांमुळे शेजारील परिसरातही वेगाने विकास होऊ लागला आहे. हीच स्थिती राहिली तर भविष्यात हद्दवाढीबद्दल विचार केला जाऊ शकतो.
सर्वसमावेशक विकास आराखडा अमलात कधी आणला जाणार?
राजीव – शासनाकडून ‘एमएमआर’च्या हद्दवाढीची अधिसूचना प्रकाशित केली जाईल. त्यानंतर नव्या क्षेत्रासाठी पुरवणी प्रादेशिक आराखडे तयार केले जातील. ‘एमएमआर’चे सध्याचे प्रादेशिक आराखडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पुरवणी आराखडेही याच आराखड्यांनुसार आहेत. शासनाची पुरवणी आराखड्यांना मंजुरी मिळेपर्यंत ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सध्याचे प्रादेशिक आराखडे लागू असतील.
या हद्दवाढीमुळे पाण्याचा प्रश्न सुटेल का?
राजीव – भूपृष्ठाखालील आणि जमिनीवरील पाण्याचे मोलाचे वरदान ‘एमएमआर’ क्षेत्राला लाभले आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या क्षेत्रातही पाण्याची चांगली उपलब्धता आहे. हद्दवाढीच्या क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या प्रकल्पांना त्याचा लाभच होईल.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmat

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis