सरकारकडून स्वस्तात सोनेविक्री; 11 ऑक्टोबरपर्यंत खरेदीची संधी

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदीला प्राधान्य दिले जाते. अनेकजण नवरात्री आणि दसऱ्याला मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी करतात. त्यासाठी केंद्र सरकारने सोने खरेदीदारांना खुशखबर दिली आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सोनेविक्रीसाठी नवीन बाँड बाजारात आणले आहेत. सॉवरेन गोल्ड बाँड 2019-20 मध्ये गुतंवणूक करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.

7 ऑक्टोबरला ही योजना सुरू झाली असून 11 ऑक्टोबरपर्यंत या योजनेत सोनेखरेदी करता येणार आहे. सर्वसामान्यांना सोने खरेदी करता यावी, यासाठी मोदी सरकारने पाचव्यांदा ही योजना आणली आहे. या गोल्ड बाँडची किंमत 3,788 रुपये प्रतिग्रॅम ठेवण्यात आली आहे.

या योजनेत ऑनलाईन गुतंवणूक केल्यास 50 रुपये प्रतिग्रॅमची सूटही मिळणार आहे. ऑनलाईनवर हे बाँड 3,738 रुपये प्रतिग्रॅम या किंमतीत मिळणार आहेत. या काळात इश्यू प्राइज 3,738 रुपये प्रतिग्रॅम असणार आहेत.

या बाँडमध्ये गुतंवणूक करायची असल्यास एक ग्रॅमपासून म्हणजे 3,738 रुपयांपासून याची सुरुवात करता येणार आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची सुरुवात मोदी सरकारने 2015 मध्ये केली होती. सप्टेंबरमध्ये या गोल्ड बाँडची किंमत 3,890 रुपये प्रति ग्रॅम होती. मात्र, सोन्याचे भाव घसरल्याने सरकारने गोल्ड बाँडच्या किंमती कमी केल्या आहेत. या गोल्ड बाँडचे विशेष म्हणजे बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत हे बाँड खरेदी करता येणार आहेत. या योजनेच्या किंमती रिझर्व्ह बँकेकडून ठरवण्यात येतात. या बाँडसाठी गुतंवणूक करण्यासाठी कमीतकमी एक ग्रॅमची मर्यादा आहे. तसेच यावर आयकरातही सूट मिळते. तसेच या योजनेवर बँकेकडूनही कर्ज मिळण्याची सोय आहे.

पोस्ट ऑफीस, बँका, एनएसई, बीएसई आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनकडून या बाँडची विक्री करण्यात येते. सोन्याची प्रत्यक्ष मागणी कमी करून बाँडमध्ये गुतंवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. डिमांड डाफ्ट, चेक किंवा ऑनलाइन पेमेंटद्वारे या बाँडची खरेदी करण्यात येते. या बाँडमध्ये एका व्यक्तीसाठी सोने खरेदीची मर्यादा 500 ग्रॅमपर्यंत आहे. तर एकत्र हिंदू कुटुंब एक वर्षात 4 किलो मूल्यापर्यंतच्या सोन्याची खरेदी करू शकते. सोन्याच्या किंमती वाढल्यास या बाँडमध्ये गुतवणूक केलेल्यांना फायदा होतो. हे बाँड पेपर किंवा इलेक्ट्रिक फॉरमॅटमध्ये असतात. ज्याप्रमाणे सोने ठेवण्यासाठी लॉकरची गरज असते. त्याप्रमाणे या बाँडसाठी लॉकरची गरज भासत नाही. या बाँडमधून वर्षभरात अडीच टक्के रिटर्न मिळू शकतात. तसेच या बाँडमध्ये कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीची शक्यता नाही. हे बाँड आठ वर्षांनंतर मॅच्युअर होणार आहेत. म्हणजेच यात गुंतवणूक केलेली रक्कम आठ वर्षांनंतर काढता येणार आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Saamana

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis