राज ठाकरे सभा LIVE – माझा आवाका मला माहिती आहे, मला प्रबळ विरोधी पक्ष व्हायचंय – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या यंदाच्या निवडणुकीतल्या पहिल्या सभेला मुंबईत सुरूवात झाली आहे. सांताक्रुजमध्ये ही सभा होत आहे.

  • राज्यातल्या शहरांचं नियोजन कोलमडलं आहे.
  • पीएमसी बँक कुणी बुडवली?
  • न्यायालयांकडून न्याय मिळणार आहे का?
  • तुमच्या जाणीवा मेल्या आहेत का, राज ठाकरे यांचा लोकांना सवाल.
  • तुम्ही कधी प्रश्न विचारणार आहात, राज ठाकरेंचा लोकांना सवाल.
  • आज मला तुमच्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष व्हायचंय.
  • माझा आवाका मला माहिती आहे, मला प्रबळ विरोधी पक्ष व्हायचंय.

9 ऑक्टोबरला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
पण मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी साचल्यानंतर ही सभा रद्द करण्यात आली होती.

ईडीनं केलेल्या चौकशीनंतर आपल्या पहिल्या प्रचारसभेत राज ठाकरे नेमकं बोलणार काय याकडे सर्वांचेच लक्ष होतं.

माझं तोंड बंद होणार नाही – राज ठाकरे

मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर गेला की तुम्हाला हे ट्वीट दिसेल. “मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही.”

ईडी चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे हे शांत बसले झाले आहेत अशी टीका त्यांच्यावर होत होती त्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं. हे ट्वीट मनसेनी पिन करून ठेवलंय.

त्यामुळे आज ते काय बोलतील याकडे सर्वांचे कान लागले आहेत.

‘लाव रे तो व्हीडिओ’

2019 ची लोकसभा निवडणूक न लढवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ही घोषणा राज ठाकरेंनी केल्यानंतर पहिल्या प्रचारसभेसाठी 5 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रचारसभेची तारीख पुढे ढकलण्यात आली.

9 ऑक्टोबरची पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर आज मुंबईतल्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते. पण त्यांनी भाजपविरोधात सभा घेतल्या होत्या. त्यांचा ‘लाव रे तो व्हीडिओ’ हे वाक्य सर्वांनाच पाठ झालं होतं.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनी राज्यात 125 हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यातले बहुतांश उमेदवार हे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरी भागातील आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या ट्विटर टाइमलाइनकडे पाहिले तर त्यावर मूलभूत सुविधांचे प्रश्न सातत्याने ते मांडत आहेत.

source: bbc.com/marathi

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: BBC Marathi

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis