Maval : भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांच्यामुळे मावळ तालुक्यात विकासकामाची गंगा

एमपीसी न्यूज – वाडीवळे गावात भाजप उमेदवार बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत नागरिकांनी केले. सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार करत यावेळी मंत्र्यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. कारण त्यांच्यामुळे मावळ तालुक्यात विकासकामाची गंगा वाहत आहे, असे नागरिक सांगत आहेत.

यावेळी भाजप उमेदवार बाळा भेगडे म्हणाले, तालुक्यातील प्रलंबित 40 ते 50 वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावू शकतो. जर तीन महिन्यांत तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवू शकतो तर, पुढील 5 वर्षे सत्ता मिळाली तरी संपूर्ण मावळचे चित्र बदलून टाकू शकेल. देशात राज्यात जर सत्ता भाजपची असेल तर तालुक्यातही भाजपची सत्ता आली पाहिजे. तालुक्याच्या विकासासाठी मंत्री पाहिजे, केवळ आमदार नको.
गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला घरकुल मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना आचारसंहिता संपल्यावर हप्त्या हप्त्याने पैसे मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना मावळात चालू केली आहे. रेल्वे पूल,रस्ते लाईट स्मशानभूमी कामे पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री पेय जल योजनेतून गावासाठी 32 लाख, मुख्य रस्त्यासाठी 4 लाख रुपयांची योजना गावात आणली आहे.

बुधवडी:- गावात भाजप उमेदवार बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गावामध्ये आमदार बाळा भेगडे यांच्या माध्यमातून गावातील कामगारांच्या खात्यात 5000 जमा झाले होते. तसेच गावात 10 घरकुल मंजूर झाले असून 116 महिलांचे विमा काढले आहेत. बुधावडी गावात 10 लाख रुपयांचा रस्ता मंजूर झाला आहे. स्मशामभूमी 6 लाख, पाटबंधारे विभागाकडून 35 लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. संजय गांधी पेन्शन निराधार योजना लाभ नागरिकांना दिला जात असून महिलांना उज्वला गॅस सिलेंडर योजना लाभ मिळत आहे. डिसेंबर महिन्याच्या आत वाडीवळे पुलाचे काम सुरू करणार आणि पुढच्या दिवाळीच्या आत ते काम पूर्ण करणार आहे.

सांगिसे:- रस्ता 5 लाख रुपये, 12 लाख रुपये सभा मंडप, गावभागातून जाणार रस्ता 70 टक्के पूर्ण, इंद्रायणी नदीवरचा पूल मंजूर 15 नोव्हेंबर नंतर काम पूर्ण होणार आहे.

वेल्हवळी:- 100 घरांपैकी 88 घरे बांधकाम मजूर लाभार्थी आहेत. गावातील लोकांच्या मनात आमदार नकोय मंत्री हवा भावना आहे.

नेसावे:- 45 लोकांना घरकुल योजना मंजूर झाली आहे. भरघोस मतांनी मंत्र्यांना निवडून देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार आहे.

खांडशी:- हात जरी तोडले तरी पायाच्या बोटांनी कमळाचे चिन्हाच दाबले जाणार आहे, असा गावकऱ्यांचा निर्धार केला आहे. रोडाचे काम पूर्ण या भागाला तालुक्याच्या विकासाशी जोडण्याचे आवाहन पुढील पावसाच्या अगोदर रेल्वे पूल आणि रस्त्यावरील पूल पूर्ण करणार आहे.

.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: MPC News

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis