कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटन सोहळ्याचे मनमोहन सिंग यांना निमंत्रण

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. हा सोहळा पुढील महिन्यात दि. 9 नोव्हेंबर रोजी पार पडण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी मोहम्मद फैसल यांनी गुरुवारी दिली. इम्रान खान यांनी शब्द दिल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेला कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्‌घाटन होईल, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानक साहिब आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील गुरुद्वारा दरबार साहिब ही दोन शीख धर्मस्थळे जोडण्यात येत आहेत.
इम्रान खान यांनी पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिब कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, या सोहळ्याची तारीख अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नाही. तसेच मनमोहन सिंग हे निमंत्रण स्वीकारण्याची शक्‍यता कमी आहे. पण मनमोहन सिंग यांनी भारतातील डेरा बाबा नानक साहिबच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. मनमोहन सिंग यांच्याबद्दल पाकिस्तानात प्रचंड आदर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींऐवजी मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडू शकतात.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Dainik Prabhat

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis