कॉप्युटरचा धोका आणि डोळ्याचा व्यायाम

सातत्याने कॉम्प्युटरवर काम करणारे लोक, मोबाईलवर सातत्याने काहीतरी वाचणारे मोबाईलप्रेमी आणि सतत टी. व्ही. बघणारे टी. व्ही.चे प्रेक्षक या सगळ्यांना डोळ्यांचे काही विकार हमखास होण्याची शक्यता असते. विकार नाही झाले तरी अधूनमधून डोळ्याची आग होणे किंवा डोळे कोरडे पडणे असा त्रास संभवू शकतो. असा काही त्रास होत असल्यास खालील सोपे व्यायाम करावेत म्हणजे डोळ्यावर येणारा ताण कमी होऊन डोळ्यांना दिलासा मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरपासून आपल्या डोळ्यांचे अंतर साधारण २ फूट एवढे असावे. त्याचबरोबर कॉप्युटरवर काम करताना कॉम्प्युटर रूममध्ये पुरेसा प्रकाश असावा.

डोळ्यांना त्रास जाणवायला लागल्यास आपली दृष्टी कॉम्प्युटरपासून दूर हटवा आणि साधारण पाच मिनिटे कॉम्प्युटरच्या स्क्रिनकडे पाहू नका.
डोळे बंद करा आणि नंतर हळूच कॉम्प्युटरकडे बघून आपले काम पुढे सुरू ठेवा. कॉम्प्युटरवरून नजर हटवणे आणि साधारण अर्ध्या तासाला एकदा पाच ते सात सेकंद डोळे मिटणे हा डोळे कोरडे होण्यावरचा परिणामकारक उपाय आहे.

आणखी एक सोपा व्यायाम म्हणजे आपले दोन्ही तळहात एकमेकांवर जोरात घासा त्यातून उष्णता निर्माण होईल. ती हाताला परिणामकारकपणे जाणवेल. दोन्ही हात असे गरम झाले की ते डोळे मिटून डोळ्यावर ठेवा. साधारण २० ते ३० मिनिटांनी एकदा हा प्रयोग करायला हरकत नाही. अजून एक व्यायाम करता येण्यासारखा आहे. तो म्हणजे डोळ्यातील बुबुळे उजवीकडून डावीकडे फिरवणे आणि काही सेकंदांचा विश्राम घेऊन पुन्हा डावीकडून उजवीकडे फिरवणे अशी बुबुळे फिरवण्यानेसुध्दा डोळ्याचे त्रास कमी होतात.

सातत्याने वातानुकूलित खोलीत बसण्यानेही डोळे कोरडे पडू शकतात. तेव्हा सतत अशा खोलीत न बसता ठराविक वेळेनंतर त्या खोलीतून बाहेर पडावे आणि बाहेर पडून समोरच्या बाजूला असलेल्या झाडाच्या हिरव्या पानांकडे एकटक पहावे. हिरव्या रंगाचा थंडावा दृष्टीलाही थंडावा देतो. अशाच रितीने डोळ्यासमोर पेन्सिल धरून तिच्याकडे एकटक बघावे आणि ती पेन्सिल धरलेला हात डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असा फिरवत रहावा. हात जसा फिरेल तशी दृष्टीही फिरवावी. त्याने डोळ्यांना छान व्यायाम मिळतो आणि डोळे कोरडे होण्याचा धोका टळतो.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Majha Paper

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis