Maharashtra Election 2019:नालासोपाऱ्यात मतदानाच्या वेळी सर्व मतदानकेंद्रांवर वेब-कास्टिंग

पालघर : बोगस मतदार नोंदणी संदर्भात बहुजन विकास आघाडीने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाचे थेट चित्रीकरण (वेब कास्टिंग) करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील निवडणुका पारदर्शक पद्धतीने तसेच निर्भीडपणे संपन्न होण्यासाठी शासकीय पातळीवरील व्यवस्था अखेरच्या टप्प्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

नालासोपारा विधानसभा क्षेत्रांमधील ४५३ मूळ मतदान केंद्र असून ४७ सहाय्यकारी मतदान केंद्रे कार्यरत आहेत. या मतदारसंघात अलीकडेच झालेल्या मतदार वाढीचा दर संशयास्पद वाटत असल्याच्या तक्रारी आहेत.
या सर्व पाचशे मतदार केंद्रांच्या ठिकाणी थेट चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील दहा टक्के केंद्रंवर अशा पद्धतीनेच व्यवस्था करण्यात येणार आहे. निवडणूक कर्मचारी तसेच सैन्यामध्ये असलेल्या जिल्ह्यातील मतदारांना बॅलेट पेपर पाठवण्याची व्यवस्था पूर्ण झाली असून जिल्ह्यातील १९ लाख ५१ हजार ६६८ मतदारांपर्यंत शासकीय मतदान स्लिप पोहोचवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम १५-१६ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित असून या कामाचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर घेण्यात येणार आहे.

अपंग मतदारांच्या मदतीकरिता स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्यांना मतदानाच्यावेळी मदत करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व २ हजार १९३ मतदान केंद्रांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. अपंग मतदानासाठी डहाणू, सफाळे व वसई येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहेत.

मतदानावर निरीक्षण ठेवण्यासाठी मायक्र ो आॅब्झर्वरच्या नेमणुका झाल्या असून ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तीन-चार केंद्रे मिळून झोनल आॅफिसरच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्यास १५ मिनिटांमध्ये मतदान पूर्ववत सुरु करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. मतदानाच्या अनुषंगाने सोळा हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना तिसरा देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रम

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून स्वीप उपक्र म राबवण्यात येत असून चुनाव पाठशाला व विद्यार्थ्यांकडून ६४ हजारहून अधिक संकल्प पत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अपंग मतदारांच्या मदतीकरिता स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्यांना मतदानाच्यावेळी मदत करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. अपंग मतदानासाठी डहाणू, सफाळे व वसई येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहेत.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *