आपल्या आहारात जरूर करा स्निग्ध पदार्थांचा ( healthy fats) समावेश

आजकालच्या काळामध्ये आपण आपल्या आरोग्याबद्दल पुष्कळ जागरूक आहोत. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आहारामध्ये सर्वच घटकांचे संतुलन साधणे महत्वाचे आहे. जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने याचबरोबर आहारामध्ये स्निग्ध पदार्थही समाविष्ट करणे गरजेचे आहे. स्निग्ध पदार्थांचा भाग असलेले मोनोअनसॅच्यूरेटेड आणि पॉलिअनसॅच्यूरेटेड फॅट्स हृदयाच्या आरोग्याकरिता आवश्यक आहेत. स्निग्ध पदार्थ माफक प्रमाणात घेतल्यास ते आरोग्यास हानिकारक नाहीत.


एका मध्यम आकाराच्या अॅवोकाडोमध्ये २३ ग्रॅम इतके fats असतात.
हे fats मोनोअनसॅच्यूरेटेड असून, या मुळे शरीरातील कोलेस्टेरोल घटण्यास मदत मिळते. अॅवोकाडोमध्ये फायबरची मात्राही भरपूर आहे. या मध्ये सोडियम नाही, आणि लुटेईन नावाचे अँटी ऑक्सिडंट आहे, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये इ जीवनसत्व, फोलेट आणि प्रथिनेही आहेत. पण यामध्ये कॅलरीजची मात्रा जास्त असल्याने एका वेळी एकच लहान तुकडा खावा.

लोणी आणि तुपामध्ये ओमेगा ६ आणि ओमेगा ३ फॅटी असिड्स असतात. यांच्यामुळे आपल्या मेंदूचे कार्य सुरळीत चालते आणि त्वचाही नितळ राहते. लोण्यामध्ये जीवनसत्वे आणि सेलेनियम हा क्षार आहे. तुपामध्ये अ, ड आणि इ जीवनसत्वे आहेत. ज्यांना दूध पचत नाही त्यांनी आपल्या आहारामध्ये लोण्याचा आणि तुपाचा माफक प्रमाणात समावेश करावा. यामध्ये क२ जीवनसत्व आहे, ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते.
सुका मेवा, विशेष करून अक्रोडामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स भरपूर असतात. दररोज आपल्या आहारामध्ये अक्रोडांचा समावेश केला असता कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत होते, आणि रक्ताच्या गाठी बनून त्यांच्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना कमी होते. बदाम, पिस्ते आणि काजूंमध्ये ही आरोग्याला हितकारी fats आणि जीवनसत्वे आहेत. त्यामुळे सुक्या मेव्याचा समावेश आपल्या आहारात जरूर करावा.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Majha Paper

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis