PAN कार्ड मिळवण्याची माहिती

स्थायी खाते क्रमांकातुन (PAN) एका दहा अंकी वर्णाक्षर सांख्यिकी अंकाचा उल्लेख केला जातो. भारतातील आयकर विभागाकडुन लैमिनेटेड कार्डच्या स्वरुपात तो देण्यात येतो. इन्कमटॅक्स दाखल करणाऱ्या सगळ्यांकडे पॅननंबर असलाच पाहिजे, कारण इन्कमटॅक्स त्याचप्रमाणे देशातील कोणत्याही आयकर अधिकारीतेबरोबरच्या पत्रव्यवहारावर पॅनचा निर्देश करणे आयकर विभागाने अनिवार्य केले आहे.

त्याचप्रमाणे, प्रत्यक्ष करांच्या मध्यवर्ती बोर्डाने वेळोवेळी अधिसुचना काढुन आर्थिक व्यवहारांशी निगडीत सर्व दस्तऐवजांवर पॅनचा उल्लेख अनिवार्य केला आहे. यात मोटर वाहनांची किंवा स्थावर मालमत्तेची खरेदीविक्री, तसेच हॉटेल आणि रेस्टौरंटमधील किंवा विदेशप्रवासातील विशिष्ट मर्यादेपलीकडील रक्कम रोखीने चुकती करण्याचा समावेश होतो.
टेलीफोन किंवा सेलफोनची जोडणी मिळवतानाही पॅनचा निर्देश अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ५,००० रुपयांच्या पुढील मुदत ठेव ठेवताना किंवा बँकेत ५०,००० किंवा अधिक ठेव रोखीने भरतानाही पॅनक्रमांक नमुद करावाच लागतो.

पॅनक्रमांकासाठी अर्ज कसा करावा?

पॅन क्रमांकासाठी अर्ज करणे सोपे आणि सुविधाजनक असेल याची हमी आयकर विभागाने दिली आहे. तुम्हाला फक्त ४९ अ या क्रमांकाचे अपेक्षित अवेदनपत्र दाखल करावे लागेल. युटीआय इनव्हेस्टर सर्व्हिसेस लिमिटेड (निरनिराळ्या शहरांमधील आयकर पॅन क्रमांकांचे व्यवस्थापन पाहणारी अधिकृत एजन्सी) किंवा नैशनल सिक्युरिटीज डिपॉसिटरी लिमिटेड (NSDL) यांच्या वेबसाईटवरून पॅन क्रमांकासाठीचे आवेदनपत्र (फॉर्म) डाऊनलोड करता येतो. स्थानिक छपाई कारागिराकडुन त्याची छपाई करता येते किंवा छायाप्रतही (A4 आकाराच्या कागदावर) काढता येते, अथवा इतर मार्गांनी ते मिळवता येते. आयकर पॅन सेवा केंद्रांवर किंवा टीआयएन सुविधा केंद्रांवर देखील हे फॉर्म उपलब्ध आहेत.

फॉर्मवर लावण्यासाठी तुम्हाला नजीकच्या काळातील एका रंगीत छायाचित्राची (स्टेम्प साईज : ३.५ सेमी X २.५ सेमी) आवश्यकता आहे. फॉर्म ४९ ए मधील आयकर विभागाच्या संबंधीत करआकारणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा हुद्दा व कोड नमुद करणेही आवश्यक आहे.NSDL वेबसाईटच्या यादीत (https://tin.tin.nsdl.com/pan/index.html) नमुद केलेल्या आयकर पॅन सेवा केंद्रांकडुन ही माहिती मिळु शकते. त्याचबरोबर अर्जासोबत ओळखीचा आणि निवासाचा दाखलाही द्यावा लागतो.
भरलेले आवेदन पत्र, अपेक्षित शुल्कासह जवळच्या आयकर पॅन सेवा केंद्रात किंवा टीआयएन सुविधाकेंद्रात दाखल करावे.

पुढे दिलेल्या सुविधेचा वापर करून अशी केंद्रे कोठे आहेत याचा शोध घेता येईल :

* आयटी पॅन सेवा केंद्र IT PAN Service Centres
* टीआयएन सुविधा केंद्र TIN Facilitation Centres

नवा पॅनक्रमांक मिळविण्याचा अर्जही नेटच्या माध्यमातुन दाखल करता येतो.
शिवाय, पॅनक्रमांकाच्या माहितीतील दुरुस्तीची किंवा बदलाची विनंती आणि प्रत्यक्षात असलेल्या पॅन क्रमांकासाठी नविन पॅनकार्ड मिळविण्याची विनंतीही इंटरनेटवरून करता येते. अधिक माहितीसाठी http://www.tinnsdl.com येथे भेट द्या. पॅन क्रमांक मिळण्याचा अर्ज इंटरनेटवरून सादर करून नामनिर्देशीत क्रेडीट कार्डवरून त्याची रक्कम चुकती केल्यास पॅनक्रमांक प्राधान्याने मिळतो आणि त्यासाठी ई-मेलद्वारे तुमच्याशी संवाद साधला जातो.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Majha Paper

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *