कोरोना संकट : देशात कोरोनाने मोडले सर्व विक्रम

रुग्णांचा आकडा पोहोचणार ४० हजारांवर

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशभरातील कोविड-१९ संक्रमित रुग्णांची संख्या ३९ हजार ९८० वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत यात १३०१ लोकांनी जीव गमावला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली.
या आकडेवारीने कोरोनाचे आत्तापर्यंतचे देशातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

गेल्या २४ तासांत कोरोनाशी लढा देताना ८३ जणांची झुंज अपयशी ठरली आहे. तर देशभरात एकूण २ हजार ६४४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, यात आशेचा किरण म्हणजे एकूण १० हजार ६३३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. देशभरातील लॉकडाऊन हा १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीनुसार, रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन, असे विभाग ठरवण्यात आले असून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे.

देशाचा सर्वात मोठा शत्रू ठरलेल्या कोरोना विषाणू विरोधात लढणाऱ्या योद्ध्यांना सलाम करण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी लढाऊ विमानांद्वारे पुष्पवृष्टी केली. डॉक्टर, परिचिका, पोलीस, डिलिव्हरी देणारे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, बँक कर्मचारी तसेच विविध सरकारी कर्मचाही आणि प्रसार माध्यमांतील कोरोना योद्ध्यांचे आभार मानण्यात आले. आपल्या प्राणांची पर्वा न करता डॉक्टरांसह अन्य सर्वजण या युद्धात उतरले आहेत. या दिवसाला कोरोना योद्धा दिवस असे नाव देण्यात आले आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचे पाच हजार रुग्ण

गुजरातमध्ये एकूण ३३३ नव्या कोरोना रुग्णांची भर दिवसभरात पडली आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा आता पाच हजारांवर पोहोचला आहे. एकूण मृतांची संख्या २६२ झाली आहे. अहमदाबाद शहरात २० जणांचा मृत्यू झाला आहे. हा एका दिवसातील आकडा आहे. राज्यातील आरोग्य विभागाने ही माहिती जाहिर केली आहे.

प्रवासी मजूरांची दगडफेक

गुजरातच्या सुरतहून उत्तर प्रदेशात निघालेल्या प्रवासी मजूरांनी गुजरातच्या सीमेवर बसवर दगडफेक केली. उत्तर प्रदेशला निघालेल्या या वाहनाला गुजरातच्या सीमेवर थांबवण्यात आले होते. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावेळी मजूरांचा संताप अनावर झाल्याने दडगफेक करण्यात आली. हा प्रकार शनिवारी रात्री उशीरा घडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे पुढे जाण्यासाठी योग्य कागदपत्र किंवा परवानगी नसल्याने त्यांना अडवण्यात आले होते.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Tarun Bharat Mumbai

(Visited 12 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis