पुणे : कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आलेले दोन नातेवाईक बाधीत

लोणी काळभोर (वार्ताहर) – हडपसर येथील एका खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान गुरुवारी (ता. 30 ) मध्यरात्रीच्या सुमारास मृत्युमुखी पडलेल्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या पंचविस नातेवाईंकांच्या पैकी दोन जवळचे नातेवाईक कोरोना बाधीत असल्याचे आढळुन आले आहे. तर उर्वरीत तेवीस जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव या्ंनी दिली.

कदमवाकवस्ती हद्दीतील माळवाडी येथील एक सत्तर वर्षीय महिला हडपसर येथील खाजगी रुग्नालयात उपचार चालु असताना मृत्युमुखी पडली होती. या महिलेच्या संपर्कात आलेल्या पंचवीस जनांची कोरोना तपासणी शुक्रवारी (ता.
1) पुणे येथील शासकीय रुग्नालयात करण्यात आली होती. या तपासनीचा अहवाल शनिवारी (ता. 2 ) रात्री अकरा वाजता आला आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. जाधव म्हणाले, कदमवाकवस्ती ह्द्दीतील माळवाडी येथील एका सत्तर वर्षीय महिलेला मुत्राशयाचा होत असल्याने, बुधवारी (ता. 29) दुपारी हडपसर येथील एका खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबधित महिलेवर उपचार चालु असताना, गुरवारी मध्यरात्रीच्या समारास उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु झाला. मृत्युनंतर खाजगी रुग्नालय प्रशासनाने संबधित महिलेची कोरोना टेस्ट केली असता, वरील धक्कादायक प्रकार पुढे आला होता.

दरम्यान मृत्युमखी पडलेली महिला कोरोना बाधीत असल्याचे लक्षात येताच, आरोग्य विभागाने संबधित महिलेच्या संपर्कात आलेल्या पंचविस नातेवाईकांना कोरोनाच्या तपासनीसाठी पुणे येथील शासकीय रुग्नालयात हलविले होते. पंचविस जनांचा कोरोना तपासनी अहवाल आरोग्य विभागाला मिळाला असुन, दोन जण पॉझिटिव्ह तर तेवीस जण निगेटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Dainik Prabhat

(Visited 12 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis