पोलीस दलाच्या मदतीला धावले माजी सैनिक

नगर – पोलीस दलाचा ताण हलका करण्यासाठी भिंगार व परिसरातील सेवानिवृत्त लष्करी जवान धावून आले आहेत. विनामूल्य सेवा करण्यास तयार असलेल्या साधारण 125 जवानांना स्पेशल पोलिसांचा दर्जा देण्यात येणार असून, तसा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साधारण दीड महिन्यापासून बंदोबस्तावर असलेले अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वत:च्याच घरी गेलेले नाहीत. त्यातून अनेकांना आता असह्य त्रास होत आहे. त्यांना काही काळ का होईना, आरामाची नितांत गरज आहे. बंदोबस्ताच्या अतिरिक्त ताणामुळे अनेकांचे स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना थोडीशी मदत म्हणून माजी सैनिकांनी विनामूल्य सेवा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
माजी सैनिकांच्या या भूमिकेबद्दल सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. पोलीस दलाने देखील या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.

भिंगार व परिसरातील साधारण 125 सेवानिवृत्त लष्करी जवान ही सेवा देणार आहेत. भिंगार छावणी परिषद पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक प्रवीण पाटील यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्तावास हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच हे स्पेशल पोलीस सेवेत दाखल होतील. त्यांना आठ-आठ तासांची ड्यूटी देण्यात येणार आहे.

नगरमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या सुरुवातीच्या काळात वाढत गेली. त्यात तबलिगी कनेक्‍शन उघड झाल्यानंतर पोलिसांचा ताण आणखी वाढला. जामखेडचा थेट संपर्क आलेल्या मुकुंदनगर व आलमगीर परिसरात तातडीने संचारबंदी घोषित करावी लागली. या संचारबंदीमध्ये दोनदा वाढही करावी लागली. त्याचा पोलीस दलावर प्रचंड तणाव होता. त्यामुळे अनेक पोलिसांना स्वत:च्या घरी देखील जाता आले नाही. मात्र, आधिच अपुऱ्या असलेल्या संख्याबळामुळे पोलीस खात्यातील वरिष्ठांचाही नाईलाज होता.

दरम्यान, सारखे ड्यूटीवर असल्याने त्यातील अनेकजण तणावात आहेत. अनेकांना सक्त आरामाची देखील सध्या गरज आहे. मात्र, अशावेळी सेवा कोण देणार, असा प्रश्‍न होता. माजी सैनिकांची पोलिसांनीही अडचण दूर करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी करतात तशी किमान आठ-आठ तास विनामोबदला त्यांनी ड्यूटी करण्याची तयारी दर्शविली आहे. लष्करातील सेवेप्रमाणेच ही ड्यूटी केली जाईल, असा विश्‍वास त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव मंजूर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Dainik Prabhat

(Visited 11 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis