‘मी महाराष्ट्र आहे..’ गाण्याला मिळतोय रसिकांचा चांगला प्रतिसाद

मुंबई – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त मराठी कलाकारांनी ‘मी महाराष्ट्र आहे..’ हे गाणं काल (दि. १) रिलीज केलं होते. दरम्यान, त्यांच्या या गाण्याला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कधीही न झुकणारं महाराष्ट्राचं स्पिरिट आणि महाराष्ट्रात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान या कलाकारांनी गाण्यातून मांडला आहे. मी महाराष्ट्र आहे या गाणे गाणाऱ्या या गायकांमध्ये मराठी भाषे व्यतिरिक्त इतर भाषिक गायकांचा सुद्धा समावेश आहे. सध्या ‘मी महाराष्ट्र आहे..’ हे गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या गाण्यात अरुण नलावडे, सचिन खेडेकर, भरत जाधव, कमलेश सावंत, क्रांती रेडकर, अनिकेत विश्वासराव, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, रिंकु राजगुरु, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, संस्क्रुती बालगुडे, संतोष जुवेकर,स्पृहा जोशी, श्रुती मराठे, वैदेही परशुरामी, आरोह वेलणकर, अक्षय केळकर, निखिल चव्हाण, रोहित फाळके, राधा कुलकर्णी हे कलाकार पहायला मिळत आहेत.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Dainik Prabhat

(Visited 2 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis