Lockdown News:आयटी कर्मचाऱ्यांवर कपातीचे संकट; ६ लाख कर्मचारी होणार बेरोजगार?

हैदराबाद : आयटी क्षेत्रातील लघु आणि मध्यम कंपन्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन तेलंगणा सरकारने केंद्र सरकारला केले आहे. टाळेबंदी, कपात यासारख्या परिस्थितीतून वाचण्यासाठी पर्याप्त मार्ग काढण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

तेलंगणाचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री के.टी. रामाराव यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांना याबाबत पत्र लिहिले आहे. यावरील काही उपायोजनाही त्यांनी सुचविल्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की, हैदराबादमध्ये आयटी क्षेत्रात ६ लाख कर्मचारी आहेत. ते कोरोनामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत. छोट्या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
या पत्रात म्हटले आहे की, लघु व मध्यम कंपन्यांसाठी कर्जाची मर्यादा ५० टक्क्यांनी वाढवायला हवी. जेणेकरून या कंपन्या आपल्या कर्मचाºयांचे आगामी तीन ते चार महिन्यांचे वेतन करू शकतील. हे कर्ज चार महिन्यांपर्यंत व्याजमुक्त असायला हवे आणि परतफेडीसाठी कंपन्यांना किमान १२ महिन्यांचा कालावधी दिला जावा.

केंद्राने जीएसटीसंदर्भात काही सूट जाहीर केली होती. त्यानंतर बºयाच कंपन्यांनी पूर्ण टॅक्स भरला. त्यामुळे केंद्र सरकारने आता रिफंड त्वरित जारी करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

एच-१ बी व्हिसानंतर आता अमेरिकेचे टार्गेट ओपीटी

एच-१ बी व्हिसानंतर आता अमेरिकेचे टार्गेट ओपीटी उच्चशिक्षण घेणाºया भारतीय विद्यार्थ्यांवर होऊ शकतो परिणाम

न्यूयॉर्क : एच-१ बी व्हिसानंतर आता अमेरिकेचे टार्गेट ओपीटी (आॅप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग) असणार आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून या उपाययोजना केल्या जाऊ शकतात. याचा थेट परिणाम उच्चशिक्षण घेणाºया भारतीय विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, डिपार्टमेंट आॅफ होमलॅण्ड सिक्युरिटीजचे प्रमुख चॅड वुल्फ यांनी म्हटले आहे की, ही संघटना टेम्पररी व्हिसा वर्कर्सची समीक्षा करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर ही कार्यवाही करण्यात येत आहे. कोरोनामुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढली असून, त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. अमेरिकेत २.५ कोटी बेरोजगारांचा प्रश्न उभा ठाकला आहे.

काय आहे ओपीटी?
अमेरिकेतील इमिग्रेशन सर्व्हिसेसने ओपीटीला टेम्पररी एम्प्लॉयमेंट म्हणजेच अस्थायी रोजगाराच्या स्वरूपात परिभाषित केले आहे. याचा उपयोग शिक्षणासाठी आलेले विदेशी विद्यार्थी करतात. ओपीटीचा कालावधी एक वर्षाचा असतो. जर विद्यार्थी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथचा विद्यार्थी असेल, तर त्याला २४ महिन्यांचा विस्तार कालावधी मिळू शकतो. या विषयांंच्या पदवीधारकाला तीन वर्षांचा अस्थायी रोजगार मिळतो. कंपन्यांनाही ही योजना फायद्याची आहे. त्यांना टॅक्समधून सवलत मिळते.

भारतीय विद्यार्थ्यांना लाभ : भारतीय विद्यार्थी चीनसोबतच या योजनेचे मोेठे लाभार्थी आहेत. एका अहवालानुसार, अमेरिकेत २ लाख ५० हजार भारतीय पदवीधारक आहेत. २०१८ मध्ये ७० हजार भारतीयांना ओपीटीअंतर्गत जॉब मिळाला.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmat

(Visited 4 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis