Maharashtra Corona Live | भारतात कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांवर, 11 दिवसात 20 हजार रुग्ण वाढले

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांवर, 11 दिवसात 20 हजार रुग्ण

भारतात कोरोनाचा कहर सुरुच, 1 ते 20 हजार रुग्ण होण्यास 12 आठवडे, 20 ते 40 हजार रुग्ण अवघ्या 11 दिवसांत

03/05/2020,12:47PM

शरद पवारांचं मोदींना पत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध, केंद्राचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि नियोजनशून्य, असा पवारांचा आरोप, या निर्णयानं राजकीय तिढा निर्माण होईल, मुंबईतलं केंद्र हलवणं देशाच्या अर्थकारणाला धोक्याचं, शरद पवार यांचा दावा

03/05/2020,12:12PM

कोरोनाचा कहर सुरुच, अकोल्यात 12 नवे रुग्ण

अकोल्यात आजच्या दिवसात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नाशीपार

03/05/2020,12:18PM

भारतीय सैन्याची कोरोना योद्ध्यांना सलामी

भारतीय सैन्यदल आणि नौदलाकडून कोरोना योद्धांना मानवंदना, हॅलिकॉप्टरमार्फत रुग्णांलयांवर पुष्पवृष्टी, मुंबईतील कस्तुरबा आण जे. जे. रुग्णालयांवरही पुष्पवृष्टी

03/05/2020,10:12AM

गोव्यात पणजी मेडिकल कॉलेजवर वायूसेनेची पुष्पवृष्टी

गोव्यात पणजी मेडिकल कॉलेजवर वायूसेनेची पुष्पवृष्टी

03/05/2020,10:26AM

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 हजारांच्या घरात

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची 40 हजारांच्या घरात, 39 हजार 980 रुग्णांची आतापर्यंत नोंद, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची महिती, 28 हजार 46 रुग्ण देशभर उपचाराधीन, 10 हजार 633 रुग्णांना डिस्चार्ज

03/05/2020,10:07AM

अमरावतीत आणखी 1 नवा कोरोना रुग्ण

अमरावती : खोलापुरी गेट येथील 62 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह, अमरावतीत 10 जणांचा कोरोनाने मृत्यू, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, अमरावती शहरात आतापर्यंत 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, सध्या 40 रुग्णांवर उपचार सुरु

03/05/2020,10:05AM

सातारा जिल्हा कारागृहात आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण

सातारा : सातारा जिल्हा कारागृहात आणखी दोन कैद्यांना कोरोनाची लागण, काल दोन कैद्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, पुणे येथील येरवडा कारागृहातून सातारा कारागृहात आणलेल्या 46 कैद्यांपैकी 4 जणांना कोरोनाची लागण, सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 77 वर

03/05/2020,10:12AM

औरंगाबादेत आणखी 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण

औरंगाबादेत आणखी 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 273 वर पोहोचला, काल दिवसभरात 40 रुग्णांना कोरोनाची लागण, आतापर्यंत 9 जणांचा करोनामुळे मृत्यू, तर 25 रुग्णांना डिस्चार्ज

03/05/2020,10:02AM

पुण्यात ससून रुग्णालयाला प्लाझमा थेरपीसाठी परवानगी

पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयात प्लाझमा थेरपीला आयसीएमआरची परवानगी, कोरोनामुक्त झालेल्या बाधितांचे रक्त घेऊन त्याद्वारे प्लाझमा थेरपीच प्रयोग करण्यासाठी ससूनचा मार्ग मोकळा

03/05/2020,9:59AM

पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीसह कोरोनावर मात

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची कोरोनावर मात, दोघांनाही रुग्णालयातून डस्चार्ज, शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात संबंधित पोलिस कर्मचारी कार्यरत, पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर पोलीस क्वारंटाईन

03/05/2020,9:56AM

भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना

भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना

03/05/2020,9:51AM

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 289 वर

नवी मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच

03/05/2020,10:07AM

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: TV9 Marathi

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis